Posts

Showing posts from February, 2019

शालेय प्रकल्प

प्रकल्प लेखन प्रकल्प 1.  शैक्षणिक प्रकल्प,प्रकल्पासाठी लागणाऱ्या बाबी       व  कसा तयार करून घ्यावा.          शालेय  प्रकल्प म्हणजे काय ?-             विद्यार्थ्यानी शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा           एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले           वय,आकलन शक्ती,स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज           उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला            उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.    अ. प्रकल्पाची उद्दिष्टे-  स्वयंअध्ययनाची सवय लागणे.  स्व-कुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.  स्वतःमध्ये उपजतच असणाऱ्या निरिक्षण,निवेदन,संकलन, सादरीकरण आदी क्षमताचा विकास      घडवणे.  ...