माझे रचनावादी भाषिक उपक्रम
जोडाक्षरांचे
वाचन
प्रथम
एक जोडाक्षर असणारे शब्द मोठ्या ठसठशीत अक्षरात कागदाच्या चिठ्ठ्यांवर लिहून
घ्यावे. प्रत्येक शब्द स्वतंत्र चिठ्ठीवर लिहावा. उदा. ‘स्त’ हे जोडाक्षर घेतले.
वस्तू, शिस्त, हस्त, पुस्तक,कुस्ती मस्त,
असे शब्द कागदाच्या चिठ्ठ्यांवर लिहिलो.
एकेक शब्द मोठ्याने वाचून मुलांसमोर ठेवला. मुलानाही ते म्हणायला सागितले. नंतर
कैचीने त्या प्रत्येक चिठ्ठीचे दोन भाग केले. जोडाक्षरातील एक अक्षर व दुसर्या
भागावर अर्धे अक्षर येईल याची काळजी
घेतलो. आता दोन्ही भागचे वाचन घेतले.अक्षर अर्धे असल्यामुळे वरील उदाहरणातील
अर्ध्या भागाचा उच्चार ‘पुस’ न होता ‘पुस’ होईल. बाब मुलांच्या लक्षात आणून
दिलो.नंतर दोन्ही भाग त्यांच्यासमोर काही अंतरावर ठेवून शब्द कसा बनला हे समजावून
सांगीतलो.
हाच
उपक्रम तीन चार प्रकारच्या जोडाक्षरांसाठी घेवून शब्द उच्चारून दाखविलो. मुलांना
इतर जोडाक्षरांचे उच्चार करून दाखवून त्यातील जोडाक्षर कोणते हे ओळखायला सांगीतलो.
कोणते अक्षर अर्धे असेल हे ओळखायला सांगीतलो. नंतर तेच शब्द लिहून त्यांचे उत्तर
तपासायला सांगीतलो. आता सरावाने मुले अचूक अंदाज करू लागले. आता जोडाक्षरांचे
श्रुतलेखन सुरु केले आहे.
‘र’ चे उपक्रम
देवनागरी लिपीत ‘र’ हे अक्षर दुसऱ्या अक्षराला जोडायचे असल्यास वेगवेगळ्या खुणा वापरल्या जातात. त्या पुढीलप्रमाणे आहेत.
Comments
Post a Comment