सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन ' या संकल्पनेचा शब्दश: अर्थ मुलांचे सतत व सर्व अंगाने होणारे मूल्यमापन . यात प्रामुख्याने दोन घटकांचा समावेश करण्यात आला आहे- आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन . या त सातत्यपूर्ण आकारिक मूल्यमापन करावे लागते. अभ्यासक्रमात दिलेल्या निकषांनुसार विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते किंवा नाही , याची नियमितपणे पडताळणी करणारे मूल्यमापन, वर्षभर अध्ययन-अध्यापनप्रक्रिया सुरू असतांना केले जाणारे मूल्यमापन , अध्ययनातील प्रत्येक उद्दिष्ट साध्य करण्यापूर्वीच्या प्रक्रियेची पडताळणी करणारे मूल्यमापन इत्यादी आकारिक मूल्यमापन होय. विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व आकार घेत आसतना नियमितपणे करावयाचे मूल्यमापन. यात खालील साधन तंत्रांचा वापर केला जातो . दैनंदिन निरीक्षण 2. तोंडीकाम ( प्रश्नोत्तरे, प्रकट वाचन, भाषण संभाषण, गटचर्चा, मुलाखत इत्यादी. ) 3. प्रात्यक्षिक / प्रयोग 4. उपक्रम / कृती 5. प्रकल्प 6. चाचणी 7. स्वाध्याय 8. इतर : ( प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, स्वयं मूल्यमापन, गटक...