Posts

Showing posts from September, 2016

Rachanavad

लॅमिनेशन घरच्या घरी स्वतः करा तेही लॅमिनेशन मशीन शिवाय . कृती :- 1) A4 साईझ मध्ये प्रिंट / झेरॉक्स काढा .( दोन्ही बाजूस / पाठपोठ प्रिंट काढू शकता .) 2) लॅमिनेशन पेपर मध्ये व्यवस्थित घालून घ्या . 3) वर्तमान पत्रात ते लॅमिनेशन पेपर घाला व त्यावर ऍडजस्ट ने इस्त्री फिरवा . वर्तमान पत्र लॅमिनेशन पेपर च्या खालून व वरून असलं पाहिजे आणि इस्त्री प्रमाणात गरम करा . 4) दोन मिनटात लॅमिनेशन तयार . 5) पायलट पेन किंवा इतर जेल पेन ने लॅमिनेशन वर सहज लिहलं जात व ओल्या कापडाने पुसलं पण जात . या पद्धतीने 1 झेरॉक्स 2 + एक लॅमिनेशन पेपर 5 + एक पेन 10= म्हणजे एकूण 20 रुपये पर्यंत खर्च येईल . * अशा प्रकारे कधीही , कुठेही सराव घेता येईल शिवाय खर्च हि मर्यादित .* चला तर मग डाउनलोड करा व ज्ञानरचवाद - वापर / सराव घ्या . * अशा प्रकारे तुम्ही हि तुमच्या कल्पकतेने अधिक मटेरियल तयार करू शकता . मी नमुना दाखल दिले आहे .*