Posts

Showing posts from 2018

अभयारण्य

*जाणून घेऊया महाराष्ट्रातील अभयारण्ये.* *महाराष्ट्रात एकूण ६१९१६ चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे व ते एकूण राज्याच्या २१ टक्के आहे. राज्यात खालील प्रकारच्या वनांचा समावेश होतो.* उष्ण कटिबंधीय पानगळीची शुष्क वने उष्ण कटिबंधीय पानगळीची दमट वने उष्ण कटिबंधीय काटेरी वने उष्ण कटिबंधीय सदाहरित वने समशीतोष्ण रुंदपर्णीय पर्वतीय वने सागरी किनाऱ्यावरची भरती ओहोटीची दलदलीय वने महाराष्ट्रात खालील अभयारण्यांचा समावेश होतो (विभागानुसार) _*कोकण*_ कर्नाळा अभयारण्य चांदोली अभयारण्य तानसा अभयारण्य फणसाड अभयारण्य बोरीवली राष्ट्रीय उद्यान मालवण समुद्री अभयारण्य माहीम अभयारण्य _*पश्चिम महाराष्ट्र*_ कोयना अभयारण्य दाजीपूर अभयारण्यन नांदूर मधमेश्वर अभयारण्य नान्नज अभयारण्य भीमाशंकर अभयारण्य मुळा-मुठा अभयारण्य सागरेश्वर अभयारण्य रेहेकुरी अभयारण्य सुपे अभयारण्य हरिश्चंद्रगड-कळसूबाई अभयारण्य *_विदर्भ_* अंधारी अभयारण्य चपराळा अभायारण्य गडचिरोली गुगामल अभायारण्य अमरावती मेळघाट (वाघ) अभायारण्य अमरावती नर्नाळा - अकोला अंबाबरवा अभयारण्य काटेप...

मोबाईल स्क्रिन मिररींग

मोबाईल स्क्रीन मिररिंग सोपी पध्दत   मोबाईल स्क्रीन मिररिंग मोबाईल मिररिंग च्या बर्याच पद्धती आहेत . पण मला आवडलेले अत्यंत सोपी पद्धत .पटकन मोबाईल लॅपटॉप वर मिरर होतो . यासाठी मोबाईल वर फक्त Airdroid नावाचे Apps google play store वरून घेऊन install करून घ्यावे लागेल  .laptop वर कोणतेही software घ्यायची गरज नाही .नेट ची गरज नाही व अमर्यादित काळासाठी चालते .pc ला देखील होवु शकते पण pc ला wifi असणे आवश्यक. कृती  सर्वप्रथम मोबाईल मध्ये Airdroid हे apps install करा. मोबाईल व laptop चे wifi व नेट बंद करा . मोबाईल चे hotspot सुरु करा .   आता laptop चे wifi सुरु करून मोबाईल च्या hotspot ला connect करा .  आता मोबाईल वर Airdroid हे apps ओपन करा . Apps ओपन केल्यावर tools मधे tethering मधे जा .समोर  IP Address दिसतो . आता laptop वर google क्रोम किंवा मोझीला फायरफॉक्स हे browser ओपन करा .  browser च्या Address बार वर Apps वरील  IP address टाका . व इंटर दाबा .  आता मोबाईल वर except opion दिसेल except करा . आता laptop वर screenshot option द...

शाळेतील शिक्षक दिन

Image
सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा. *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडअहेरी* येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा. शिक्षक दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका शिला गोंगले होत्या. उपक्रमशील शिक्षक संजय कोंकमुट्टीवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यानिमित्ताने शाळेत स्वयंशासन उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात अनोक सडमेक याने मुख्याध्यापकाचे भुमिका पार पाडली. शाळेतील 10 विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून कर्तव्य पार पाडले. यानिमित्ताने शिक्षक दिन यावर कविता गायन व भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हास्नी ईदुलवार हिने केले. तर आभार सायली राऊत हीने मानले. यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.