शाळेतील शिक्षक दिन
सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा.
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडअहेरी* येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा.
शिक्षक दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका शिला गोंगले होत्या. उपक्रमशील शिक्षक संजय कोंकमुट्टीवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यानिमित्ताने शाळेत स्वयंशासन उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात अनोक सडमेक याने मुख्याध्यापकाचे भुमिका पार पाडली. शाळेतील 10 विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून कर्तव्य पार पाडले. यानिमित्ताने शिक्षक दिन यावर कविता गायन व भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हास्नी ईदुलवार हिने केले. तर आभार सायली राऊत हीने मानले. यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
Comments
Post a Comment